अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून करोना महामारीचे संकट देशभरात थैमान घालत आहे. करोना कमी होईल ही अपेक्षा असतांना आता पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे.
नुकतेच जिल्ह्यातील राहाता व संगमनेरात कोरोनाचा कहर वाढलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात करोनाचे काल दिवसभरात 60 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यात सर्वाधीक 17 रुग्ण लोणी बुद्रुक, शिर्डीत 13 रुग्ण तर राहाता साकुरीत 12 रुग्ण आढळले आहेत. लग्न सोहळे, बाजार व नियमीत होणारी गर्दी तसेच बेफीकीरपणे वागणे यामुळे रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संगमनेरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला संगमनेर तालुक्यात गेल्या 24 तासात 42 करोना बाधीत आढळून आले आहे. प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरीकांना अनेक बंधने घालून देण्यात आली आहे.
मात्र नियमांचे उल्लंघन होत असल्याने करोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. बुधवारपर्यंत तालुक्यात 263 तर गुरुवारी 42 करोना बाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.
करोनाबाबत शासकीय यंत्रणाही ढिली झाली असून कोवीड तपासणीत बाधीत निघाल्यावर रूग्ण घरात क्वॉरंटाईन होतो असे सांगतात मात्र अनेक ठिकाणी करोना पॉझीटीव्ह रूग्ण खुलेआम शहरात व गर्दीच्या ठिकाणी हिंडताना दिसून येत आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|