Redmi 12C : भारतातील दिग्ग्ज टेक कंपन्यांपैकी रेडमी ही एक कंपनी आहे. शानदार फीचर्समुळे ही कंपनी अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत स्मार्टफोन लाँच करत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या फोनची किंमत खूप कमी असते.
अशातच कंपनी आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता सॅमसंग, ओप्पोला टक्कर देणारा Redmi 12C हा आगामी स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात ग्राहकांना 5000mAh बॅटरी मिळणार आहे.तसेच 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येणार आहे.

टिपस्टरच्या मतानुसार, या फोनचा मॉडेल नंबर Redmi 22120RN86I हा आहे. तसेच या फोनचा मॉनीकर BIS सूचीमध्ये दाखवला नाही. जर या फोनच्या ग्लोबल वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा मॉडेल नंबर 22120RN86G आहे. कंपनीच्या नवीन फोनमध्ये 50-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह 5000mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
Redmi 12C receives the TDRA certification and the Indian BIS certification.#Xiaomi #Redmi #Redmi12C pic.twitter.com/eSyTE4UGGY
— Mukul Sharma (@stufflistings) March 2, 2023
फीचर आणि स्पेसिफिकेशन
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये तुम्हाला 6.71-इंचाचा डिस्प्ले मिळत असून जो HD+ रिझोल्यूशनसह येऊ शकतो. स्टोरेजचा विचार केला तर कंपनी हा फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च करू शकते. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये कंपनी ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 चिपसेट देऊ शकते.
तर वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे असू शकतात. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 5-मेगापिक्सेल QVGA दुय्यम सेन्सरचा समावेश असू शकतो. तर कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीसह येईल. जर याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 Go Edition वर बॉक्सच्या बाहेर काम करेल.