Railway Refund Rules : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवते. यामध्ये प्रवासी लांब रांगेत उभे न राहता घरबसल्या म्हणजेच ऑनलाईन तिकीट काढू शकतात, तसेच काढलेले तिकीट रद्द करू शकतात.
अनेकदा काहीजणांची ट्रेन चुकते. या प्रवाशांना परतावा मिळतो. अनेकांना रेल्वेच्या या नियमाची माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊयात रेल्वेचा हा नियम काय सांगतो?

रेल्वे उशिरा आल्याने अनेक प्रवाशांच्या गाड्या चुकत आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.यामध्ये प्रवाशाला दुसऱ्या तिकिटासाठी पूर्ण परतावा मिळतो. त्यासाठी त्याने अचूक माहिती भरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हे लक्षात घ्या की पहिल्या तिकिटाचा अरायव्हल पॉइंट आणि दुसऱ्या तिकिटाचा डिपार्चर पॉइंट सारखाच असणे आवश्यक आहे.
लक्षात ठेवा या गोष्टी
बोर्डिंग स्टेशन बदलण्याशी निगडित या नवीन कायद्यात, प्रवाशाला रेल्वे सुटण्याच्या चार तास अगोदर त्याचे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळते, म्हणजेच चार्ट बनण्यापूर्वी प्रवासी त्याचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात.
परंतु, हे लक्षात घ्या की चार्ट तयार केल्यानंतर प्रवाशांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही. हा नियम सर्व प्रवाशांना लागू होईल, ज्यांच्याकडे ‘तत्काळ’ तिकीट असले तरीही, सामान्य कोट्यात आरक्षण आहे.
त्याचबरोबर ज्या प्रवाशांकडे काउंटर तिकिटे आहेत त्यांना प्रवासाच्या सुरुवातीच्या ठिकाणी रेल्वे अधिकार्यांना कळवावे लागेल, तसेच ई-तिकीट असणारे चार्ट तयार करण्यापूर्वी IRCTC वेबसाइटवर लॉग इन करून बोर्डिंग स्टेशन बदलता येते.
त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की प्रवाशांना आता 139 वर कॉल करून बोर्डिंग स्टेशन बदलण्याची विनंती करू शकतात. परंतु, हा फोन कॉल चार्ट तयार होण्यापूर्वी चार तास किंवा त्यापूर्वी फॉरवर्ड करावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची ही सुविधा सर्व प्रवाशांसाठी मोफत असते.