अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कोरोना लस घेण्यास नकार देणाऱ्या हवाई दलाच्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने गुजरात उच्च न्यायालयात याबद्दलची माहिती दिली आहे.
हवाई दल अधिकारी योगेंद्र कुमार यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान केंद्राकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास हजर झाले होते. ते म्हणाले, सशस्त्र दलांतही लसीकरण अनिवार्य सेवा-शर्तीमध्ये समाविष्ट आहे.
हवाई दलातील केवळ नऊ कर्मचाऱ्यांनी लसीकरणास नकार दिला. त्यापैकी एकास सेवा-शर्तींच्या उल्लंघनावरून निलंबित करण्यात आले आहे. त्याने कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम