अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलसाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे.
मात्र वेळेच्या बाहेर पेट्रोलची मागणी केल्याने कर्मचाऱ्याकडून मनाई करण्यात आली. याचाच राग मनात धरून पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्याला चौघांकडून बेदम मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
शिरडमधील सावळीविहिर येथील गणेश गोविंद भवर (वय 21) हा पेट्रोल पंपावर ड्युटी करत असताना तेथे संदीप रमेश विघे, सचिन रमेश विघे,
विशाल अशोक आगलावे, प्रशांत पालकर, सर्व राहणार सावळीवीहीर हे आले आणि आम्हाला बाटलीमध्ये पेट्रोल दे असे म्हणू लागले.
त्यावर भवरने पेट्रोल फक्त अत्यावश्यक वाहनासाठी देण्याची परवानगी आहे व बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास मालकाने मनाई केली आहे असे त्या चौघांना सांगितले.
त्याचा राग आल्याने त्यांनी हातातील लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने भवर यांच्या हातावर, पायावर, पोटरीवर व डोक्यात मारहाण केली.
याप्रकरणी गणेश गोविंद भवर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम