अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याला पोलिसांना पकडले असून आता त्याच्याकडून या हत्याकांडाविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पोलिसांसमोर तोंड उघडले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून तपासाचा भाग असल्याने माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला असला तरी याबाबत आज मोठा खुलासा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
हैदराबादमधून बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पारनेर न्यायालयात हजर केले. पारनेर न्यायालयाने बोठेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोठेला एमआयडीसीतील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. चौकशीसाठी त्याला नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयात आणले जाते.
गेल्या तीन दिवसांपासून बोठेकडे कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान सुरूवातीला तोंड न उघडणारा बोठेने तोंड उघडले आहे. रेखा जरे यांची हत्या कोणत्या कारणातून केली, यासह अन्य गोष्टी पोलीस तपासात समोर आल्या आहेत. पोलिसांनी त्याविषयी गोपनियता बाळगली असली तरी आज याविषयी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|