अहमदनगर जिल्ह्यात नात्याला फासला काळीमा : नातेवाईकानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  एका युवकाने आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

याबद्दल पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या तरुणावर नगर तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जामखेड रस्त्यावर असलेल्या एका गावात तो तरुण आणि पीडित अल्पवयीन मुलगी राहावयास आहे.

याच गावातील तरुणाने त्या पीडित मुलीला तुमच्या घरच्यांनी तुला बोलावले आहे. असे म्हणून त्या मुलीला गाडीवर बसवले. गावाच्या जवळ असलेल्या एका पुलाच्या खाली घेऊन जात अल्पवयीन मुलीला तू जर कोणाला काही सांगितलं तुला जीवे मारून टाकेल असे म्हणत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

ही घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्यासह नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक जारवाल इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe