कारवाई शिथिल करा; नगराध्यक्ष आदिक यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

याच अनुषंगाने श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे प्रशासनाने नियम कडक केले आहेत. श्रीरामपूर शहरातील काही दुकानदारांवर विनाकारन कारवाई झाली असल्याचे नगराध्यक्ष आदिक यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या लक्षात आणून दिले.

नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, शहरातील एक व्यापारी दुकान बंद करून घरी गेला होता. मात्र दुकानात पैसे राहिल्यामुळे त्यांनी पुन्हा दुकान उघडून फक्त गल्ल्यातील पैसे घेऊन जात असताना पोलिस आले.

त्यांनी तुमचं दुकान उघडे होते, असे म्हणत कारवाई केली. संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली तरीही कारवाई झाली.

अशा पद्धतीने कारवाई करणे चुकीचे आहे, तसेच गेल्या वर्षांपासून करोनामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. तशात अश्या कारवायांमुळे मोठे नुकसान होत आहे.

दुकानावरील कारवाईचे जाचक नियम शिथिल करावेत, व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष आदिक यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe