अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्यामुळे घोड मधुन तातडीने आवर्तन सोडावे तसेच कुकडीच्या चालु आवर्तनातुन तलाव व नाले भरावेत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे केली आहे.
सध्या ०३/०८/२०२१ रोजी घोड धरणाचा पाणीसाठा २६७५ द.ल.घ.फूट [ उपयुक्त पाणीसाठा १५६९ द.ल.घ.फूट (३२.२०%)] इतका झाला असुन घोड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे लाभक्षेत्रातील खरीप हंगामातील पिकांकरिता कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत लाभधारकांकडून मागणी होत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/12/Babanrao_Pachpute-2-scaled.jpg)
तसेच कुकडी धरणामधून कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी चालू आहे. या पाण्यामधून माझ्या श्रीगोंदा तालुका लाभक्षेत्रातील सीना धरण, विसापूर तलाव, मोहरवाडी तलाव, औटेवाडी तलाव, लेंडीनाला तलाव, घोडेगाव तलाव, भावडी तलाव, वेळू तलाव, व इतर सर्व लहान मोठे तलाव व बंधारे जास्तीत जास्त क्षमतेने भरून घेणे गरजेचे आहे.
तरी घोड प्रकल्पाच्या कालव्याद्वारे खरीप हंगामातील प्रथम आवर्तन सुरु करण्याबाबत व कुकडी ओव्हरफ्लो च्या पाण्यामधून तलाव बंधारे भरणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी जलसंपदा मंत्री पाटील यांच्या कडे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम