कोरोना रूग्णांना दिलासा : रेमडेसिवीरच्या किमतीत घट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी वणवण पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली.

तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विटवर ही माहिती दिली.

डिसेंबर २०२० मध्ये करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेमडेसिवीर तयार करण्याऱ्या कंपन्यांनी उत्पादन घटवलं होतं. त्यात करोनाची दुसरी लाट आल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली.

त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तसेच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली.

कंपन्यांचे नवे दर कसे असतील :-

  • }कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड रेमडॅक इंजेक्शनचा दर २८०० रुपयांवरून ८९९ रुपये केला आहे.
  • }सिजीन इंटरनॅशनल लिमिटेडनं रेमविन इंजेक्शनचा दर ३९५० रुपयांवरुन २४५० रुपये इतका केला आहे.
  • }डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज लिमिटेडनं रेडिक्स इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून २७०० इतका केला आहे.
  • }सिपला लिमिटेडनं सिप्रेमी इंजेक्शनचा दर ४००० रुपयांवरून ३००० रुपये इतका केला आहे.
  • }मायलॅन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं डेसरेम या इंजेक्शनचा दर ४८०० रुपयांवरून ३४०० इतका केला आहे.
  • }ज्युबिलँट जेनेरिक लिमिटेडनं जुबी-आर इंजेक्शनचा दर ४७०० रुपयांवरून ३४०० रुपये इतका केला आहे.
  • }हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडनं कोविफोर या इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून ३४९० रुपये इतका केला आहे.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe