अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२० या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या कालावधीत नगर जिल्ह्यात २७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होती.
बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२० या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .
या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक एका क्षणात भुईसपाट झाले होते.या आपत्तीत शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले होते. त्यामुळे गारपीट झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार या गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाकडून मदत प्राप्त झालेली आहे.
बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी २७४ कोटी ७६ लाख ५२ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ४ कोटी २८ लाख २३ हजार रुपये चा समावेश आहे.
या कालावधीत नगर जिल्ह्यात २७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होती. बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved