रेमडेसिवीरचा काळाबाजार तेजीत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- पाथर्डीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असुन अठराशे रुपयाचे इंजेक्शन विस हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे.

रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने घेणारा व विकणारा दोघेही व्यवहाराची वाच्यता होवु नये म्हणुन काळजी घेतात.

येथील एक युवक इंजेक्शनसाठी तिन तालुक्यात जाऊनही त्याला ते मिळाले नाही, अखेर पाहुण्याच्या मदतीने त्याला वीस हजार रुपये मोजुन इंजेक्शन मिळाले.

नातलगाचा जीव वाचला हेच खुप झाले तुमचे तत्व तुमच्या जवळच ठेवा असे म्हणुन काळाबाजार होत असतानाही त्याला दुजोरा देण्यास युवकाने नकार दिला. पाथर्डीत कोवीड सेंटरची संख्या वाढली आहे.

तीन खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी सुरु केलेल्या कोवीड सेंटरमधे रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार चांगले मिळत असले तरी तेथे बेडची मर्यादा कमी आहे.

खाजगी कोवीड सेंटरमधे उपचार घेणाऱ्यांना रेमडेसिव्हीर मिळत नाही. शेवगाव, श्रीरामपुर, नगर येथुन इंजेक्शन आणुन देणारे काही जण पाथर्डीत असल्याचे समजते. रुग्णांची गरज महत्वाची असल्याने काळाबाजार करणाऱ्यांची माहिती समोर येत नाही.

आमच्या नातलगांचा जीव महत्वाचा आहे. तुमचे तत्व काय कामाचे नाही. इंजेक्शन काय किमतीत मिळाले हे महत्वाचे नाही तर ते मिळाले हेच खुप उपकार आहेत.

आभाळच फाटलय आपण कुठे कुठे शिवणार अशी प्रतिक्रिया येथील एका युवकाने नाव न छापण्याचा अटीवर दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe