मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कारखान्याच्या मालकीच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षकांकडून तसेच कारखान्याच्या कामगारांच्या पगारातून कपात केलेले तीन कोटी पन्नास लाख रुपये गेले कोठे?
असा प्रश्न जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक आण्णासाहेब शेलार यांनी मढेवडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
नागवडे कारखान्यात होणाऱ्या चुकीच्या कारभाराबाबत लक्ष वेधून राजीनामा दिला होता. मात्र, तो राजेंद्र नागवडे यांनी स्वीकारला नाही. मात्र शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुतळ्याचे अनावरण होताच माझे संचालक पद रद्द करण्यात आले,
असा आरोप शेलार यांनी केला. शेलार म्हणाले, स्व. शिवाजीराव नागवडे बापूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे
यांनी शरदचंद्र पवार यांच्या समोर बापूंच्या नावाने कारखान्याच्या माध्यमातून मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा केली. मात्र कामगारांच्या पगारातून कपात केलेले
तीन कोटी पन्नास लाख रुपये गेले कोठे?. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचे पद हटवल्याने निवडणूक थांबणार नाही. संचालकपद रद्द केल्याने मी कोर्टात जाणार असल्याचेही शेलार म्हणाले.