अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करा!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-ज्यांनी या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरांचा जीर्णोध्दार करून हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.

या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर, जन्मस्थानअसलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करावे.

अशी मागणी प्रा. राम शिंदे युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. पांडुरंग माने यांनी केली आहे. ते म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत.

कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने राम आणला.  हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता.

त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.विशेष म्हणजे या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी हे आहे.

महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृती पुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे करण्यात यावे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व अहिल्यानगरचे माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे मागणी करण्यात येणार आहे. असे ते म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe