Renault Kiger : भारतीय बाजारात अनेक कार निर्माता कंपन्या एकमेकांना टक्कर देताना दिसतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या सतत आपल्या नवनवीन कारमध्ये शानदार फीचर्स आणि मायलेज देत असतात.
अशातच आता मार्केटमध्ये तुम्हाला आणखी एक टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण लवकरच भारतीय बाजारात रेनॉल्टची नवीन कार लाँच होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची ही आगामी कार टाटा पंचला टक्कर देऊ शकते. काय आहे या कारची खासियत जाणून घेऊयात.
जाणून घ्या फीचर्स
नवीन रेनॉ किगरमध्येही उत्कृष्ट फीचर्स दिली आहेत. यामध्ये कंपनीने एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्ससह आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील दिले आहेत. तसेच यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासारखी जबरदस्त फीचर्स दिली आहेत.
कसे असेल इंजिन?
कंपनीच्या या कारमध्ये मजबूत इंजिनही दिले आहे. यामध्ये दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. तसेच यात 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.0L एनर्जी पेट्रोल इंजिन आहे. कंपनीने आपल्या नवीन ग्राहकांसाठी यामध्ये फाइव्ह-स्पीड एएमटी आणि एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी युनिट ट्रान्समिशन दिले आहे. कंपनीच्या मतानुसार, ही कार तुम्हाला 20.62 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.
किती आहे किंमत?
किमतीचा विचार केला तर अजूनही कंपनीनं या कारच्या किमतींबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु कंपनी तिची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत ठेवेल. त्यामुळे जर तुम्हालाही उत्तम कार खरेदी करायची असल्यास रेनॉल्ट इंडियाची ही शानदार कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.