रेसिडेन्शिअल हायस्कुलचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रेसिडेन्शिअल हायस्कुल अहमदनगर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले आहे.

या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. कु.ढगे संस्कृती (१६३ गुण), कु. कुलांगे संस्कृती (१५९ गुण). कु. नवले समृद्धी (१३८ गुण), ची. पवार आशिष (१२९ गुण), ची. जाधव अनिकेत (११५ गुण) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

या परीक्षेत ८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.या मधून ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार झावरे,

उपाध्यक्ष श्री. रा.ह.दरे , सचिव श्री. जी. डी. खानदेशे, सहसचिव ऍड. विश्वासराव आठरे , खजिनदार श्री. मुकेशदादा मुळे, प्राचार्य श्री. अशोकराव दोडके, उपमुख्याध्यापक श्री. मोटे बी.के. , पर्यवेक्षक श्रीम. भापकर टी.आर.,

मोरे एम.ए., गोबरे व्ही.एच., सर्व शिक्षक, पालक आदींनी अभिनंदन केले. प्राचार्य अशोकराव दोडके यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना श्रीमती दरे जे.ए., श्री. घुंगार्डे बी.जी. यांचे मार्गदर्शन लाभले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!