महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपाचे आजचे आंदोलन फसवे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आज त्यांनी महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडून संभाव्य कोरोनाची तिसरी लाट विषय आढावा बैठक घेतली.

या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी ,प्रांतधिकारी, तहसीलदार ,प्रशासकीय अधिकारी तसेच संगमनेर तालुक्याचे आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर उपस्थित होते. तसेच आमदार सुधीर तांबे दुर्गाताई तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

आजचे भारतीय जनता पार्टीचे ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून जे काय आंदोलन केले आहे ते आंदोलन फसवे आहे अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

ओबीसींच्या आरक्षण विषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही वारंवार केंद्र सरकारला विनंती केली कि आम्हाला ओबीसी समाजाची आकडेवारी द्या तर केंद्र सरकार आकडेवारी देण्यास टाळाटाळ करत आहे.

तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे आज आंदोलन केले आहे ते आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करावी अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe