अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी आहेत. मात्र, तपास सुरू असल्याने त्यावर सध्या बोलणे योग्य नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
ते म्हणाले, सरकारं बदलत असतात, पण पोलिस यंत्रणा आहे तीच असते. महाराष्ट्र आणि मुंबईची पोलिस यंत्रणा ही जगप्रसिद्ध आहे. स्कॉटलँड यार्डनंतर आपल नाव घेतल जाते. पोलिसांच मनोबल खच्ची होणार नाही, याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी.
विरोधक सत्तेत होते तेव्हा तेच पोलीस दल होतं आपल पोलीस दल सक्षम आमचा त्यावर विश्वास आहे.विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरणं म्हणजे आम्हाला काळजी वाटते की यात कुठले राजकारण, तर नाही ना ?
राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात थोरातांनी कोरोनाची दुसरी लाट आली असताना आपण मात्र बेफिकीर झालोत, ही बेफिकेरी आपल्याला त्रासदायक ठरणार आहे.
सरकारकडून केवळ अपेक्षा करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करणे गरजेच आहे. स्वत: आणि कुटुंबासाठी कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|