अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यात रविवारी सायंकाळी सातपर्यंत १५ रुग्ण कोरोना बाधित सापडले. शनिवारी ४३ रुग्णसंख्या होती. दिवसेंदिवस श्रीरामपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून निर्बंध कडक करणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोना अनिर्बंध वाढेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.
श्रीरामपूर तालुक्यात रविवारी कोरोना चाचणीत १५ रुग्ण कोरोना बाधित आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी होणारी आठवडे बाजार, शाळा महाविद्यालये, लग्न समारंभ, आंदोलने येथे विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, तशी काळजी घेतली जात नाही.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगल कार्यलयात गर्दीवर मर्यादा आल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात सार्वजनिक समारंभात गर्दी दिसत आहे. ग्रामीण भागातही अशा कार्यक्रमात गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
दरम्यान, श्रीरामपुरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात ५०, संतलुक रुग्णालयात १००, साई कोविड सेंटर येथे २८, साई शीतल कोविड सेंटर ३२, अल्फा हॉस्पिटल ३९, मोरगे हॉस्पिटलमध्ये ३०, तर कोरोना केअर सेंटर येथे १०० असे ३७९ बेडची सुविधा उपलब्ध आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|