अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- मागील वर्षी राज्यातील कोरोना लाट रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी काम केले. मात्र चार महिन्यात नागरिकांचा निष्काळजीपणा कोरोनाच्या दुसर्या लाटेचे कारण बनून पहात आहे.
हे चिंताजनक आहे. लॉकडाऊन पर्याय नाही, तर स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात साखर कारखाना विश्रागृहावर शनिवारी आयोजित कोरोना आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे,
पोलिस उपअधीक्षक राहूल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार जर्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, महेश वाव्हळ व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत तालुका व शहरात कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लसीकरण, कोविड सेंटर, रुग्ण तपासणी व्यवस्था याबाबत माहिती घेत मंत्री थोरातांनी अधिकार्यांना सूचना केल्या. आमदार डॉ. तांबे म्हणाले, नागरिकांनी लसीकरणाला घाबरु नये.
समारंभ व गर्दी टाळण्यासाठी पदाधिकार्यांनी मार्गदर्शन करावे. हा संकटाचा काळ असल्याने भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. कोरोना साखळी तोडणे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष तांबे प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|