महसूल मंत्री ना.थोरात यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पोलीसांची माफी मागावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने संगमनेर मध्ये पोलीसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तर हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

दि.6 मे रोजी संगमनेर मध्ये पोलीसांवर काही जमावाणे अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला आहे. पोलीस कोरोनाच्या संकटकाळात देवदूताची भूमिका बजावत आहे. या तालुक्यात महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मतदार संघ आहे.

ते स्वत: सत्ताधारी पक्षात मंत्री आहेत. त्यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे पदवीधर मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी दुर्गाताई तांबे या तालुक्याच्या नगराध्यक्षा आहेत. तर त्यांचे भाचे सत्यजित तांबे हे युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. सदर कुटुंबीय या परिसराचे लोकप्रतिनिधी आहेत.

अशा तालुक्यात पोलीसांवर हल्ले होणे शरमेची बाब आहे. जे पोलीस आपल्या कुटुंबापासून लांब राहून कोरोना महामारीत इतर कुटुंबीयांच्या रक्षणासाठी झटत आहे.

कोरोनाने अनेक पोलीस बाधित झाले आहे. तर अनेकांचा जीव देखील गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकरणात पोलीसांवर हल्ला करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व लोकप्रतिनिधी असलेल्या थोरात कुटुंबीयांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पोलीसांची जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

तर अशा संकटकाळात शिवराष्ट्र सेना पक्ष हा पोलिस प्रशासनाच्या पाठिशी उभा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe