महसूलमंत्री थोरात म्हणाले, शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार नेहमीच कटीबध्द

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  निळवंडेच्या कामासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्यामुळे निळवंडे कृती समितीच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कृती समीतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, गोपीनाथ घोरपडे, दादासाहेब पवार, उत्तमराव घोरपडे, लताताई डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, डॉ. रवींद्र गागरे, रवींद्र वर्पे, रावसाहेब कोल्हे, धनंजय वर्पे, शहाजी गांगवे, जालिंदर लांडे, सोपान जोंधळे, मच्छिंद्र एलम, अशोक खंडांगळे उपस्थित होते.

यावेळी ना. थोरात म्हणाले की, या कामासाठी आमच्या सरकारने निधी मंजुर केल्याने कोण खरे आणि कोण खोटे हे जनतेला कळाले आहे. सध्याचे सरकार हे शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटीबध्द आहे.

मागील सरकारने फक्त फसविण्याचे काम केले. मात्र आम्ही प्रत्यक्षात काम करत आहोत. निळवंडेच्या कामासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून

2022 च्या पावसाळ्यातील धरणात साठलेले पाणी शेतकर्‍यांच्या शेतात पोहचविण्याचा प्रयत्न आमचे सरकार करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री थोरात यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News