महसूलमंत्री थोरात म्हणतात: मुंबई पुणे येथून येणाऱ्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोना ग्राम सुरक्षा समिती यांनी मुंबई पुणे आदी ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना दहा दिवसांसाठी गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणा ठेवा.

करायचे आदेश दिले गावात कोणालाही थेट प्रवेश नाही सरपंचांनी याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. पारनेरकरांनी लॉक डाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे.

लॉकडाऊन बाबत अनेक ठिकाणी नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. मात्र पारनेरकर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निर्बंधाचे पालन करत आहेत.

असे जर ३० तारखेपर्यंत नागरिकांनी गांभिर्याने पालन केले तर येत्या काही दिवसात पारनेरचा कोरोना रुग्णांचा आकडा सर्वात कमी राहील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

यावेळी ना.थोरात म्हणाले ग्रामीण भागात संसर्ग वाढलेला आहे, लग्नसमारंभ मंगल कार्यालयातील बंद झाले मात्र ग्रामीण भागातील वस्त्यांवर लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत.

गावपातळीवर चांगले नियोजन केले तर कोरोना लवकर आटोक्यात येईल. तालुक्यात कोणालाही होम क्वारंटाईन करण्याऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले हे त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका कमी आहे.

आमदार निलेश लंके यांनी सध्या अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही व्हेंटिलेटर रेमडेसिविर लसीकरण ऑक्सिजन मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र आम्ही तालुक्यामध्ये सर्व रुग्णांना सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहे.

भाळवणी येथे १०० बेड ऑक्सिजन आहे मात्र तेथे ऑक्सिजनचा तुटवडा होत आह.े त्यासाठी ऑक्सीजन इंजेक्शन व औषधाचा पुरवठा करावा अशी मागणी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी ना.थोरात यांना एलसीडी स्क्रीनवर तालुक्यातील कोरोना संदर्भात करत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण अतिशय कमी वेळात व चांगल्या पद्धतीने केले.

यावेळी त्यांनी तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe