आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बोलणे नैराश्येतून…

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- भाजपाआणि महाविकास आघाडी सरकार यांच्याधील नेत्यांमध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात.

यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक शीतयुद्ध होत असलेले आपण पहिले असेल.

राज्यातील या दोन बड्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार संघात संपर्क राहिला नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील बोलले होते.

त्यावर थोरात यांनी पलाटवर करत नैराश्येतून राधाकृष्ण विखे पाटील यांचे बोलणे येत असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला फारसे महत्व देऊ नका.

शेवटी ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना नैराश्यातून बोलत असतात. शेवटी तो मानवी स्वभाव आहे असे थोरात यांनी म्हंटले आहे.

संगमनेरमधील घटनेसंबंधी थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘ही घटना दुर्दैवी आहे. असे घडायलाच नको होते, असे आपले मत आहे.

पोलिस आणि प्रशासन शेवटी जनतेच्या आरोग्यासाठीच काम करीत आहेत. त्यांचे काम ते करीत असताना त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे.

यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे,’ असेही थोरात म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|