Rice Varieties : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!! वैज्ञानिकांनी विकसित केल्या भाताच्या पाच जाती; शेतकऱ्यांचा होणार फायदा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 New varieties of paddy : शेतकरी शेतीतून (Farming) अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आणि पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करीत असतात.

बारामाही शेतीत राबूनही अनेकदा शेतकरी बांधवांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही यामुळे त्यांना मोठे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागते, कारण की त्यांनी लावलेल्या पिकांच्या जाती या योग्य नसतात. मात्र जर शेतकऱ्यांनी शेतात पिकांच्या उत्कृष्ट जाती लावल्या, तर त्यांना त्यांच्या शेतातून अधिक नफा मिळतो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पिकांच्या सुधारित वाणांची लागवड करण्यासाठी सरकार अनेक योजनांवर काम करत असते. याशिवाय अनेक वैज्ञानिक संस्थाही शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभ्या राहतात आणि पिकांवर नवनवीन शोध लावत असतात, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल.

आता इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाने (Indira Gandhi Agricultural University) भात पिकाच्या काही नवीन जाती (New varieties of rice crop) तयार केल्या आहेत.

या नव्या भाताच्या वाणांचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मित्रांना आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रात भात पिकाला (Rice Crop) धान किंवा साळ असे म्हणून देखील संबोधले जाते.

भाताच्या/धानाच्या नवीन जाती (New varieties of paddy)

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन तांदळाच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत.

»ट्रॉम्बे छत्तीसगड दुबराज म्युटंट-1

»विक्रम टीसीआर

»छत्तीसगड जवानफूल उत्परिवर्ती

»ट्रॉम्बे छत्तीसगड विष्णुभोग उत्परिवर्ती

»ट्रॉम्बे छत्तीसगड सोनागाठी

या सर्व जाती इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे-मुंबई यांच्या सहकार्याने तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय दुबराज, सफारी-17, विष्णुभोग, जवाफूल आणि सोनगाठीची नवीन उत्परिवर्ती जातीही अणुविकिरण तंत्राचा वापर करून तयार केल्या आहेत.

यासोबतच लवकरच भाताच्या इतर पारंपारिक जातीही तयार केल्या जातील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आम्ही तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो की, छत्तीसगडमध्ये 300 पारंपारिक जातींवर उत्परिवर्तन प्रजननाचे काम वेगाने सुरू आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी वेळेत चांगला नफा मिळू शकेल.

धानाच्या नवीन जातींची वैशिष्ट्ये (Characteristics of new varieties of Paddy)

•या वाणांमुळे शेतकऱ्यांना अधिक धानाचे उत्पादन मिळेल आणि सहाजिकच धान उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता मिळण्यास मदत होणार आहे.

•या जातींमध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असतो यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे शिवाय उत्पादनात वाढ होईल.

•या जातींचे धानाचे पीक अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होतं असते शिवाय धानाची उंची आणि जास्त उत्पादन मिळते यामुळे अल्प कालावधीतच शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ पैसा उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe