Richest Mans List : बिल गेट्सचा नोकर मेहनतीच्या जोरावर बनला जगातील पाचवा श्रीमंत व्यक्ती !

Ahmednagarlive24
Published:

Richest Mans List  : जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या एका माजी सहाय्यकाने असे काही केले आहे जे जगातील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीने स्वप्नातही पाहिले नसेल. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्समध्ये स्टीव्ह बाल्मर यांनी पाचवे स्थान पटकावले आहे.

स्टीव्ह 43 वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रेसिडेंट असिस्टंट म्हणून रुजू झाले होते. आता तोच व्यक्ती स्वतःच्या मेहनतीवर जगातील श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसला आहे. अनेक वर्षांच्या सततच्या मेहनतीमुळे त्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यशस्वीपणे अव्वल स्थान पटकावले आहे.

बाल्मर आपल्या बॉसलाही टाकू शकतात मागे
एका रिपोर्टनुसार, स्टीव्ह बाल्मर लवकरच त्यांचे माजी बॉस म्हणजेच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकेल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर मोठी गोष्ट होईल यात शंका नाही.

जगभरातील श्रीमंतांमध्ये या घटनेची आत्ताच जोरदार चर्चा सुरु आहे, मग कल्पना करा जेव्हा बाल्मर आपल्या माजी बॉसला मागे टाकेल तेव्हा काय होईल.

बिल गेट्स सध्या या पोझिशनवर आहेत
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिल गेट्स सध्या या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत, म्हणजेच स्टीव्ह कधीही आपल्या बॉसला मागे टाकून इतिहास घडवू शकतो.

115 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह बाल्मर सध्या लॅरी एलिसन (114 अब्ज डॉलर), वॉरेन बफे (111 अब्ज डॉलर) आणि मार्क झुकेरबर्ग (108 अब्ज डॉलर) यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती 121 अब्ज डॉलर आहे.

1980 मध्ये स्टॅन्डफोर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होण्याचा निर्णय बाल्मर यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी अगदी मोठे सक्सेस उभे केले आहे.

त्यानंतर बिझनेस मॅनेजर म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यांची काम करण्याची पद्धती, कामातील हिस्सेदारी आदी गोष्टींमुळे ते भरपूर श्रीमंत झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe