अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या आपल्या प्रलंबित मागण्या असो व काही इतर कारणे ते मंजूर करून घेण्यासाठी आजकाल आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो.
यामध्ये सरकारी कार्यालये अथवा लोकप्रतीनिधींची निवास्थान हे आंदोलनाचे केंद्रबिंदू असतात. मात्र रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी केले आहे.
आदिवासी संघटनेने घुसखोरी प्रश्न आदिवासी आमदार अधिवेशनात आवाज उठवत नाहीत हा प्रमुख मुद्दा घेऊन आमदार लहामटे यांच्या घरावर मोर्चा काढला होता. मात्र लहामटे उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मुंबईला होते.
बुधवारी ते अकोल्यात आले तेव्हा पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. लहामटे म्हणाले, रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको. आदिवासी समाजात झालेली घुसखोरी
या बाबत सभागृहात आपण अनेकदा आवाज उठवला आहे. आदिवासी सजग कार्यकर्त्यांना ही बाब माहिती आहे. घुसखोरी कुणाच्या काळात झाली हे समाज विसरला नाही. ज्यांनी आदिवासी समाजाच्या शेतजमिनी लुटल्या त्या त्यांनी परत कराव्यात.
अगस्ती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मार्गी लागला आहे. अगस्ती चालवताना काटकसर करा असा सल्ला उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळास दिला.
अगस्ती बचाव समन्वय समिती व संचालक मंडळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली ही बाब तालुक्याच्या हिताची आहे. असे लहामटे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम