रोहित पवार म्हणाले…लसीकरण म्हणजे उपकार नाहीत तर सरकारचं कर्तव्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- करोना प्रतिबंधक लसीकरणाची जबाबदारी २१ जूनपासून पुन्हा केंद्र सरकारनं घेतली आहे. देशातील सर्व नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी त्यावेळीच केली.

मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची यूजीसी ची सूचना आश्चर्यकारक आहे.

कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल,तसेच लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाहीत तर ते कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे.

अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रासह यूजीसीवर टीका केली आहे. देशात मोफत लसीकरणाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. त्यानुसार यूजीसीनं एक परिपत्रक काढलं आहे.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी काढलेल्या परिपत्रकात मोफत लसीकरणासंबंधी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानणारे फलक शैक्षणिक संस्थांमधून लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं विविध भाषांमधील हे फलक तयार करून दिले असून ते देशातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, तंत्र शिक्षण संस्था यांनी आपल्या परिसरात लावावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यावरून टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनीही ट्विट करीत या निर्णयावर टीका केली आहे.

यूजीसीचा हा निर्णय मोदी यांना कदाचित माहिती नसावा असे सांगून पवार यांनी युजीसीवर हल्लाबोल केला आहे. करोना आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये,’ असेही पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe