अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही, असं उत्तर देणाऱ्या केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
‘संकटावर मात करण्यासाठी रणनीती आखताना पारदर्शक आकडेवारीची गरज असते. दुर्दैवाने देशात कुठलीही पारदर्शक आकडेवारी उपलब्ध नाही.
उपलब्ध आहे ती केवळ केंद्र सरकारचं कौतुक करणारी आकडेवारी आणि हीच आकडेवारी एक दिवस संपूर्ण देशाला बुडवू शकते हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं,’ अशा शब्दांत पवार यांनी याकडे लक्ष वेधले आहे
आमदार पवार यांनी म्हटलं आहे, ‘देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं दुर्दैवी उत्तर केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आलं. याबाबत चोहोबाजूने टीका होताच नेहमीप्रमाणे केंद्राकडून अपयशाचं खापर राज्यांवर फोडण्यात आलं.
ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंचा आकडा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या रिपोर्टवर तयार करण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. भाजप नेत्यांनी राज्यांवर खापर फोडताना नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचा आवर्जून उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकी रिफील करताना तांत्रिक बिघाड होऊन ऑक्सिजन टाकी फुटल्याने ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि दुर्दैवाने २२ रुग्णांना
आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेव्यतिरिक्त राज्यात ऑक्सिजन संबंधित घटना घडल्याचं निदर्शनास आलेलं नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम