अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या दोघा रोमिओना पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अल्पवयीन मुली घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी छेड काढत एका अल्पवयीन मुलीच्या भावास शिवीगाळ व दमदाटी करुन धमकी दिल्याची घटना घडली आहे.

दरम्यान ही खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील साकूरमधील मारुती मंदिराजवळ घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

अल्पवयीन विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी जांबूर रस्त्याने चालल्या होत्या. या दरम्यान संतोष शिवाजी बर्डे (रा.मांडवे बु.) व आदिक किसन कुदनर (रा.शिंदोडी) हे दुचाकीवर आले.

त्यांनी मुलींची छेड काढली. त्याचवेळी एका मुलीचा भाऊ त्यांना घेण्यासाठी आला. त्यावेळी मुलींनी त्याला हे दोघे छेडछाड करत असल्याचे सांगितले. त्यावर त्याने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्यांनी त्याचे काहीही न ऐकता उलट त्यालाच शिवीगाळ व दमदाटी करुन ‘तुझे हातपाय तोडून पोत्यात घालून घरी घेऊन जाऊ’ अशी धमकी दिली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन संतोष बर्डे व आदिक कुदनर यांच्याविरोधात घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe