नाथभक्तांच्या सोयीसाठी ‘या’ ठिकाणी होणार रोप-वे ! रोप- वे ने ‘हे’ दोन जिल्हे एकमेकांना जोडणार!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  देशातील नाथभक्तांच्या सोयीसाठी मायंबा व मढी देवस्थान समितीकडून एक संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येत असून सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार आहे.

हा राज्यातील एकमेव असा उपक्रम ठरणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मायंबा (सावरगाव) येथे आहे. तेथून जवळच चैतन्य कानिफनाथाची मढी येथे संजीवन समाधी आहे. संपूर्ण परिसरात औषधी वनस्पती मुळे अत्यंत शुद्ध हवामान असते.

पावसाळ्यामध्ये तर या परिसरात राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दोन्ही देवस्थान समिती यांच्यातर्फे भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो. मढी- मायंबा- वृद्धेश्वर अशी भ्रमंती एका दिवसात पूर्ण होते.

मायंबा देवस्थानची उंची जास्त असून अत्यंत अवघड असा रस्ता आहे. अलीकडील काही वर्षात सर्व देवस्थाने डांबरी रस्त्याने जोडली गेली तरी सोयीस्कर दळणवळण व्यवस्था नसल्याने अनेक भाविक मढी वरून दहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात.

धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणार सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News