रोटरी इंटिग्रिटीचा बुथ हॉस्पिटलला महिनाभर ऑक्सिजनचा आधार पाच जंम्बो ऑक्सिजन सिलेंडरची भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचे प्राण जाऊ नये, यासाठी मदतीचा हात पुढे करुन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने बुथ हॉस्पिटलला ऑक्सिजनचे पाच जंम्बो सिलेंडर देण्यात आले.

तर पुढील एक महिन्यासाठी सदर टाकीच्या ऑक्सिजनच्या खर्चाची जबाबदारी रोटरी इंटिग्रिटीने उचलली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे.

अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठिण झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बुथ हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. दुसर्‍या लाटेत बुथ हॉस्पिटलने सर्वसामान्य कोरोना रुग्णांसह ऑक्सिजन बेडची सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक बनलेल्या ऑक्सिजनची जबबादारी रोटरीने इंटिग्रिटीने उचलून हॉस्पिटल मधील ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी हा उपक्रम राबविला.

हॉस्पिटलचे डॉ.मिना फुके, डॉ. राकेश थोरात व प्रशांत गायकवाड यांच्याकडे ऑक्सिजनचे सिलेंडर सुपुर्द करण्यात आले. यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी, अनिकेत रसाळ, इंटिग्रिटीचे संस्थापक जावेद शेख,

हेमंत लोहगावकर, रवी डिक्रुज, ऑक्सिजन प्लांटचे संचालक रमेश लोढा, डॉ. रिजवान अहेमद, खालिद जहागीरदार आदी उपस्थित होते. रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनसाठी सर्वांची पळापळ होत आहे.

परिस्थिती गंभीर असताना काही रुग्णांचा जीव ऑक्सिजन न मिळाल्याने गेल्याचे निदर्शनास आले आहे. बुथ हॉस्पिटलला सर्वसामान्य रुग्ण उपचार घेत आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

दररोज पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देण्याच्या या उपक्रमास एक महिन्यासाठी 75 हजार रुपये खर्च येणार असून, क्लबचे सदस्य यासाठी हातभार लावत आहे.

ही सेवा पुढे तीन महिने अविरत सुरु राहण्यासाठी इतर सेवाभावी संस्थेला जोडून हा उपक्रम पुढे सुरु राहण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. इतर सेवाभावी संस्थांनी देखील बुथ हॉस्पिटलला मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ.मिना फुके यांनी बुथ हॉस्पिटलमध्ये 157 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहे. इतर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मात्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, रोटरी इंटिग्रिटीने कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणार्‍या बुथ हॉस्पिटलचे जावेद शेख यांनी कौतुक केले. बुथ हॉस्पिटलचे सेवाभावी कार्य उत्तमपणे सुरु आहे.

गोरगरीबांची रुग्णसेवा सुरु असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये बुथ हॉस्पिटलला ऑक्सिजन कमी पडू देणार नाही.

दररोज हॉस्पिटलला आवश्यकतेनूसार ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आश्‍वासन एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लांटचे संचालक रमेश लोढा यांनी दिले. या सामाजिक उपक्रमास अनिकेत रसाळ व रवी डिक्रुज यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe