अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कृषि उत्पन्न बाजार समितीने शासन निर्देशाप्रमाणे आपल्या उत्पन्नातून १० लाख रुपयांची मदत प्रवरा कोव्हीड सेंटरला केली आहे. या रक्कमेचा धनादेश बाजार समितीच्या पदाधिका-यांनी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.
विविध दानशुर व्यक्ती आणि संस्थानी एकुण १४ लाख रुपयांची मदत या कोव्हीड सेंटरसाठी उपलब्ध करुन दिली आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यांना कोव्हीड संकटाच्या उपाययोजनांसाठी आपल्या वाढीव उत्पन्नाच्या प्रमाणात रक्कम रक्कम खर्च करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार राहाता कृषि उत्पन् बाजार समितीने आपल्या उत्पन्नातून १० लाख रुपयांची मदत कोव्हीड संकटात रुग्णांच्या उपचारासाठी प्रवरा कोव्हीड सेंटरसाठी उपलब्ध करुन दिली आहे. बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर,
उपसभापती बाळासाहेब जपे, संचालक बापुसाहेब आहेर, वाल्मीकराव गोर्डे, शरद मते, गोरक्ष गोरे, चंद्रभान बावके, यशवंत चौधरी, सचिव उध्दवराव देवकर आदिंनी हा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी स्वनिधीतून ५५ हजार ५५५ रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रवरा कोव्हीड सेंटरसाठी आज सुपूर्त केला. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडु, संचालक रामभाऊ भूसाळ,
संजय आहेर, कैलास तांबे, अशोक घोलप, देविचंद तांबे, सतिष ससाणे, साहेबराव म्हस्के, अॅड.भानुदास तांबे, डॉ.दिनकर गायकवाड, स्वप्निल निबे आदि उपस्थित होते. श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानेही स्वनिधीतून ५० हजार,
गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने २५ हजार आणि गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या सेवकांच्या पतपेढीच्या वतीने २५ हजार रुपयांची मदत कोव्हीड सेंटरसाठी देण्यात आली आहे. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकंदराव सदाफळ, अॅड.रघुनाथ बोठे,
जालिंदर निर्मळ, विजय गोर्डे, जी.आर चोळके, नितीन गाढवे, मधुकर कोते, सुदामराव सरोदे, राजेंद्र थोरात, अभिजीत भागडे आदि उपस्थित होते. या सहकारी संस्थाबरोबरच कोल्हार येथील मार्केट कमिटीमधील व्यापा-यांनी ४५ हजार रुपये,
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्यावतीने ६१ हजार, प्रा.प्रकाश रावसाहेब विखे आणि परिवाराच्या वतीने ५१ हजार, सयाजी रघुनाथ खर्डे २१ हजार, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडु ११ हजार,
गणेश कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप २१ हजार, सहकारी संस्थांचे सहाय्यक उपनिबंधक जितेंद्र शेळके ११ हजार, किसनराव विखे आणि परिवाराच्या वतीने २० हजार, डॉ.प्रशांत गोंदकर आणि डॉ.स्वाधीन गाडेकर, २१ हजार,
डॉ.श्रीकांत बेद्रे व प्रमोद बेद्रे २१ हजार, स्व.भास्कर आप्पा दिघे यांच्या स्मरणार्थ राहुल दिघे यांनी २१ हजार रुपये, डॉ.संजय कहार ११ हजार, रविराज संजय आहेर व प्रशांत संजय आहेर ५ हजार, आप्पासाहेब चोळके यांनी २१०० रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पाटील,
माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्याकडे सुपूर्त केले. आर्थिक मदती व्यतिरिक्तही अनेकांनी वस्तुरुपाने या कोव्हीड केअर सेंटरला मदतीचे सहकार्य सुरुच ठेवले आहे. डॉ.विखे पाटील कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे,
डॉ.राहुल खर्डे यांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटरचे दोन सेट तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ येथील महात्मा फुले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी १५० वेपोरायझर स्टिमर दिले आहेत,कोल्हार येथील खा.डॉ.सुजय विखे पाटील युनायटेड फ्रंट यांच्यातर्फे दोन हजार अंडी,
रविंद्र दिघे व विजय नालकर यांनी २० बॉक्स बिसलेरी बॉटल आणि छत्रपती शासन लोणी खुर्द यांच्यावतीने ७० बिस्कीटांचे बॉक्स कोव्हीड सेंटरला दिले आहेत. प्रवरा कोव्हीड सेंटरमधून आत्तापर्यंत ४८८ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत.
सध्या १९० रुग्ण या कोव्हीड सेंटरमध्ये दाखल असुन, समाजातील विविध घटकांकडून तसेच संस्थानकडुन होत असलेल्या मदतरुपी सहकार्याने तसेच माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था तसेच
प्रवरा परिवारातील विविध संस्थाच्या पुढाकाराने या कोव्हीड सेंटरमधुन रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा, जेवन, नाष्ता, औषधे मोफत दिली जात असून, आवश्यकतेनुसार ऑक्सीजन बेडची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम