अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- अहमदनगर शहरातील बागरोजा हडको ते बालिकाश्रम शाळेपर्यंतचा रोड हा शासनाच्या दलित वस्ती सुधार निधीतून 50 लाख रुपये खर्च करून कॉंक्रिटीकरण करण्यात आले
परंतु महिना उलटला नाही तेच हा रस्ता व त्यावरील काँक्रिटीकरण पूर्णपणे उघडले गेले असल्यामुळे संबंधित शासनाने दिलेला दलित वस्ती सुधार निधीतील निधी हा पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे

त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व तसेच हा रस्ता खराब झाल्याचे दिसुन आले असताना देखील कुठ्ल्याही प्रकाराची चौकशी करवाई शहर अभियंता व विभागीय या रस्त्याची देखरखीखाली नियुक्त अभियंत्यानी यांनी केली नाही
त्यामुळे ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या शहर अभियंता व संबंधित देखरेख करणाऱ्या अभियंत्यावर महानगरपालिकेने कारवाई करावी तसेच हा रस्ता खराब झालेला संपूर्ण पुन्हा नव्याने संबधीत तेकेदरकडून तयार करून घेण्यात यावा या रस्त्याचे बील संबधीत ठेकेदाराला अदा करु नये .
नागरिकांचा पैसा अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाण्यात जाऊन देणार नाही त्यामुळे हा खराब झालेला संपूर्ण रस्ता सदर ठेकेदाराने कडून पुन्हा तयार करून घेण्यात यावा अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी महानगर पालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे
व त्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच नगर विकास मंत्री तसेच नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या असून संबंधित या विषयावर आपण ताबडतोब लक्ष घालावे
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिलेला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम