सैनिक बँकेची बदनामी करणाऱ्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार …!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-  पारनेर तालुक्यातील चौघांवर खोटी माहिती देऊन बॅकेसह आपली बदनामी केल्या प्रकरणी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पारनेर सैनिक बँकेचे कर्जत शाखेचे शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत २३ लाखाचा अपहार करणाऱ्या शाखाधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी पारनेरचे बाळासाहेब नरसाळे, विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, व संपत शिरसाठ यांनी केली होती. यासाठी पारनेर बँकेच्या लेखा परीक्षण अहवालाचा हवाला त्यांनी दिला होता.

कर्जत तालुक्यातील निराधाराचे पैसे हडप करून २३लाखाचा अपहार केल्याचे यामध्ये म्हटले होते. याबाबतची सत्य परिस्थिती समाजापुढे यावी म्हणून फरांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की कर्जत तहसील कार्यालयाने २०१२ ते २०२० या कालावधीतील निराधार व्यक्तीच्या अनुदान वाटपात आमच्या बँकेचे कर्मचारी दीपक अनारसे यांनी फेरफार केल्याचा प्रकार लक्षात येताच आपण ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली.

अनारसे यांच्यावर कारवाई करत, तहसील कार्यालयाने निराधार खातेदारांना वाटप करण्यासाठी दिलेली रक्कम व प्रत्यक्ष वाटप झालेली रक्कम यातील १ लाख ४६ हजार रुपयांचा फरक आम्ही बँकेत भरणा करून घेतला.

पारनेर येथील बँकेचे सल्लागार असलेले मात्र स्वतःला स्वयं घोषित स्वीकृत संचालक म्हणवून घेणारे बाळासाहेब नरसाळे राजकीय वैमन्यस्यातून खोट्या बातम्या विविध वृत्तपत्राना दिल्या, नरसाळे यांनी संचालक मंडळ निवडणुकीचे प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारी केली होती.

पॅनल तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पॅनल पूर्ण करता आला नाही, म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. या नाराजीतून व बँकेची सन २०१९ ची निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी खोटे आरोप करत बँकेची व माझी बदनामी केली असल्याचा आरोप फरांडे यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe