सख्खा भाऊ व पुतण्यांनी केली कुऱ्हाडीने मारहाण, पती-पत्नी गंंभीर जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  अकोले तालुक्यात सख्ख्या भावाने भावाला आणि त्याच्या पत्नीला कुऱ्हाड आणि लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी पिंपळगाव खांड येथील शेरेवाडी शिवारात घडली.

याबाबत अकोले पोलिस ठाण्यात मच्छिंद्र तानाजी शेळके यांच्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीत मच्छिंद्र तानाजी शेटे आणि त्यांची पत्नी मनीषा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पावसाळ्यापूर्वी घराच्या पडवीची दुरूस्ती करण्यासाठी इतस्तत: पडलेली छतावरील कौलं गोळा करत असतानाच भाऊ, भावजय व त्यांंची दोन मुले आमच्यावर गज, काठ्या, कुर्‍हाड घेऊन चालून आली व आम्हास मारहाण केली, अशी तक्रार मच्छिंद्र शेटे यांनी दिली आहे.

मात्र, स्थानिक लोकांकडून हा प्रकार जमिनीच्या वाटपावरून घडल्याचे समजते. बबन तानाजी शेटे, सरूबाई बबन शेटे, विशाल बबन शेटे व करण बबन शेटे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe