राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सलून ची दुकाने खुली करण्यात आली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच राज्यातील लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध पुढील 15 दिवसांसाठी वाढवण्यात आले आहे.

याची अधिकृत घोषणा कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे . गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने नाशिक मध्ये खुली करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा ‘रेड झोन’बाहेर आल्याने कोरोनासंबंधित निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवारी, 1 जूनपासून दुकाने उघडली जाणार असून, त्यांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 अशी असेल. या वेळेत सलूनही सुरू असतील.

दुपारी 3 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट रविवारी 8 टक्क्यांवर आल्याने जिल्हा ‘रेड झोन’बाहेर पडला असून, निर्बंध शिथिल करण्यास पात्र ठरला आहे.

त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, गर्दी नियंत्रणासाठी पहिल्याप्रमाणेच भाजी बाजार बंद राहतील. विकेंद्रीत पद्धतीने भाजी विक्री 7 ते 2 वेळेत होईल.

किराणासह सर्व दुकाने देखील उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2, खरीपाच्या तोंडावर कृषी साहित्यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4, तर बँका, पोस्ट सकाळी 9 ते दुपारी 2 सुरू असतील.

सिनेमा, नाट्यगृह, स्विमिंग पूल पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापना मालकांना पाच हजारांचा, तर नागरिकांना एक हजार रुपये दंड करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!