अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसींमध्ये आरक्षण द्या हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारला.
पालकमंत्र्यांनी हा प्रश्न विचारा. ते कोणीही उत्तर देणार नाहीत. मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा पण, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.
मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने मराठा समाजाला धक्का बसला. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत.
या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? त्यावर संभाजीराजे म्हणाले, प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा बहुजनांचे सर्व प्रश्न सोडतो, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
तसेच राज्य सरकारकडे सारथीसंदर्भात आणि इतर काही मराठा समाजाच्या मागण्या दिल्या आहेत. त्या पूर्ण करू असा शब्द राज्य सरकारला दिला आहे.
मात्र त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर छत्रपतींची भूमिका बदलेल, असा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम