अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 70.70 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा उन्नत करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रस्ते दर्जोन्नत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती.
यासंबंधीचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून प्राप्त होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी हे रस्ते दर्जोन्नत करण्यास मान्यता दिली.
रस्त्यांची देखभाल दुरुस्ती होण्यासाठी हे रस्ते दर्जोन्नत करण्यात आले आहेत. यामध्ये प्र.रा.मा. 8 ते निमगांव डाकू –मलठण-तरडगाव-निंबोडी-सितपूर-नागपूर-नागलवाडी-मिरजगाव-गुरवप्रिंपी-चांदे बु.-बिटकेवाडी शिंदे ते कोपर्डी प्र.जि.मा 56 मिळणारा रस्ता (56.270 किमी)
आणि रा.मा.67 कुळधरण ते पिंपळवाडी-सोनाळवाडी ते राशीन रा.मा.54 मिळणारा रस्ता (14.500 किमी)
या रस्त्यांचा समावेश आहे. हे रस्ते दर्जोन्नत केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 4640.315 किमी इतकी झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम