अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने संगमनेर तालुक्यातील कौठे कांबळे येथील दहावीतील ही विद्यार्थिनी बालवयातच संसाराच्या परीक्षेला समोरे जाता जाता वाचली.
कौठे कांबळे येथील एका कुटुंबाने दहावीत शिकरणाऱ्या मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी (२२ मे) हे लग्न होणार होते.
अॅड. रंजना गवांदे यांनी याची खात्री करून संगमनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, बालविकास अधिकारी अनिता मोरे, ग्रामसेवक सुरेश मंडलिक यांना दिली. त्यांना सोबत घेऊन विवाह होणार असलेल्या कुटुंबाचे घर गाठले.
दारातच छोटा मंडप टाकून शनिवारी विवाह करण्याचे नियोजन होते. गावातीलच एका मुलासोबत ते मुलीचा विवाह करणार होते. अॅड. गवांदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची समजूत काढली.
बाल विवाहाचे धोके आणि सोबतच कायदेशीर कारवाईचीही माहिती दिली. त्यामुळे त्यांनी विवाह करण्याचा विचार रद्द केला.
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असे त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले. या बालविवाहाची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे व कार्यकर्त्यांना मिळाली आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हा होणारा बालविवाह रोखला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम