संजय राऊत म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे.

त्यानंतर बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनीही ममतांचा उल्लेख वाघीण असा करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात.

मात्र याच विषयावरून संजय राऊत यांच्यावर भाजपकडून चांगलीच टीका करण्यात आली आहे. राऊत यांच्या या ट्विटवर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच

सुरतमधील माजुरा येथील आमदार असणाऱ्या हर्ष सांघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांचं ट्विट कोट करुन रिट्विट करताना त्यांनी राऊतांना, “बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना”, असं म्हणत टोला लगावला आहे.

आपला ज्या गोष्टीच्या जडघडणीमध्ये काडीचाही सहभाग नाही अशा गोष्टींसाठी आनंद व्यक्त करणाऱ्या व्यक्तीसाठी हिंदीमध्ये, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हा वाक्यप्रचार वापरला जातो.

राऊतांकडून ममता बॅनर्जींवर कौतुकाचा वर्षाव… :- एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला.

आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं प्रसारमाध्यमांसमोर कौतुक केलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe