Sarkari Nokari Bharti 2023 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या सरकारी नोकरीचा लाभ घ्यावा. ही भरती तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये होणार आहे.
महाराष्ट्र शासन व्दारे तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध शासकीय संस्थांमध्ये गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या संधीचा पुरेपूर लाभ घावा.
भरती संबंधित अधिक माहिती :-
भरती श्रेणी
राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती होत आहे.
भरती विभाग
ही भरती तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये होत आहे.
पदाचे नाव
या भरती अंतर्गत लघुलेखक, लिपिक व इतर पदांची भरती केली जाणार आहे.
भरती प्रकार
पात्र उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
शैक्षणिक पात्रता
येथे 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
भरती कालावधी
कायस्वरूपी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करायचे आहेत. आजच उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज सादर करावेत. करा.
अर्ज सुरू
अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट 2023 पासून सुरु असून, उमेदवार 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
रिक्त जागा
या भरती अंतर्गत 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
18 वर्षांपुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज शुल्क
अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपय तर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता 900/- रुपये इतके शुल्क आहे.
अर्जाची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
आवश्यक कागदपत्रे
अनुभवाची प्रमाणपत्रे, संगणक हाताळणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग खेळाडू, माजी सैनिक या संदर्भातील दाखले, प्रमाणपत्रे इत्यादी.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा नियमानुसार 30,000 /- रुपये इतका पगार मिळेल.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-इच्छुक उमेदवार https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/ या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.