घरात निघालेल्या ०६ नागाच्या पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवदान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- राहुरी शहरातील एका घरात आढळून आलेल्या ६ नागाच्या पिल्लांना सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी निर्सगाच्या सानिध्यात सोडले.

शाहूनगर परिसरात डॉ. गायकवाड यांच्या घरी त्यांचा मुलगा घरात किचनच्या बाहेर काही वस्तू घेण्यासाठी गेला असताना त्याला एक छोटा साप आढळून आला तेव्हा त्याने आपल्या वडिलांना ही खबर दिली असता

डॉ. गायकवाड यांनी राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीव प्रेमी कृष्णा पोपळघट यांच्याशी संपर्क साधून त्यांना घरात साप असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोपळघट व त्यांचे सहकारी मुजीब देशमुख हे क्षणाचा ही विलंब न करता

घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सापाला बघितले असता ते नाग जातीच्या सापाच पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. पोपळघट यांनी त्या पिल्लाला पकडताच भिंतीच्या कडेला असलेल्या छोट्याश्या जागेतून अजून एक पिल्लू बाहेर आले.

त्यामुळे घरातील लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. त्यानंतर पोपळघट यांनी आपली शक्कल लढवून एका मागे एक असे तब्बल ६ नागाचे पिल्लं बाहेर आली. त्या सगळ्या पिल्लांना पकडून ताब्यात घेण्यात आले.

आणि गायकवाड कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला पकडलेली सर्व नागाची पिल्लं ही जंगलात सोडून देण्यात येतील , तसेच आता पावसाळा सुरु असल्यामुळे लोकवस्तीत तसेच आपल्या आवतिभोवती सर्प, नाग आढळुन येतात

तर कृपया कोणीही मुक्या प्राण्यांना मारू नये तातडीने आम्हाला पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी यावेळी सांगितले.

महिना भरापूर्वी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी स्व खर्चाने सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना सुरक्षा किट देऊन त्यांनी एका जखमी नागावर शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचविला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe