सरपंच अनिल शेवाळे यांची सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- नगर- तालुक्यातील मदडगावचे सरपंच अनिल शेवाळे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कौडगाव परिवारतर्फे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब धिवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महासंघाचे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख रामनाथ बोराडे, आगडगाव चे सरपंच कराळे, नाथ कृपा ट्रॅव्हल्स चे संचालक दारकुंडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेब धिवर म्हणाले, सरपंच अनिल शेवाळे यांनी गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.

शासनाच्या योजना गाव पातळीवर पोहचविण्याचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यामुळे गावाच्या विकासात मोठी भर पडत आहे. ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त अधिकार दिल्यास गावे स्वयंपूर्ण होतील, यासाठी सरपंच सेवा महासंंघ घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

महासंघाच्या माध्यमातून सरपंचांचे संघटन करुन गाव पातळीवरील प्रश्‍न सोडविले जातील, त्यात अनिल शेवाळे पदाला योग्य न्याय देतील, असा विश्‍वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देतांना अनिल शेवाळे म्हणाले, सरपंच सेवा संघ ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.

ग्रामपंचातीला जास्तीचे अधिकार व निधी दिल्यास गावातील विकास कामांना चालना मिळून गावचा विकास होईल.

यासाठी संघटना कार्यरत असून, आपस दिलेल्या पदाच्या माध्यमातून संघटन मजबूत करुन गावांचा विकास कसा होईल, यासाठी कार्य करु, असे सांगितले. यावेळी रामनाथ बोराडे, सरपंच कराळे, श्री.दारकुंडे आदिंनी अनिल शेवाळे यांच्या कार्याचा उल्लेख करुन अभिनंदन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe