अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील राजकीय दृदया महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच निवडीमध्ये सरपंचपद हे कायदेशीर बाबींत अडकल्याने रीक्त राहिले आहे. तर उपसरपंचपदी एकनाथ ज्ञानदेव खुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी अनुसूचित जातीची महिला राखीव उमेदवार नसल्याने सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सरपंच पद हे रिक्त राहिले आहे. तर उपसरपंच पदासाठी एकनाथ ज्ञानदेव खुळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णयक अधिकारी बन्सी वाळके यांनी केली .
त्यांना भरत साळुंखे, ग्रामसेवक संतोष राठोड यांनी सहाय्य केले. उपसरपंच पदासाठी एकनाथ खुळे यांच्या नावाची सूचना सदस्य अशोक रामदास कुलट यांनी मांडली.निवडीप्रसंगी आशाबाई दत्तात्रय खुळे, शोभा रोहिदास आढाव, लिलाबाई सिताराम गोसावी, पूजा परसराम फुणगे,विमल रोहिदास रंधे, संजय भानुदास शेळके, सुरेश जालिंदर मकासरे, सुभाष रामदास ठाकर
आदी सदस्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे, ज्ञानेश्वर खुळे,बी.आर. खुळे, बाळासाहेब खुळे, बाळासाहेब शिंदे,हरीभाऊ आढाव,नितीन आढाव,विलास आढाव,किशोर खुळे,उमेश खिलारी,सीताराम गोसावी, रोहिदास आढाव, लक्ष्मण खिलारी,फकिरचंद फुणगे, प्रशांत पुनगे,काशिनाथ खुळे, प्रकाश आढावआदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved