‘ लोकशाही वाचवा, थेट राष्ट्रपतींकडे केली मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महाराष्ट्र विधिमंडळाचे  दोन दिवसाचे अधिवेशन सुरु झाले आहे. परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रुर थट्टा ठरणार आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे.

कारण दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यासमोरील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा या अधिवेशनात होऊच शकत नाही. यामुळे विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेल्या अधिकारांवरच गदा आली आहे.

अधिवेशन काळात विकासासंदर्भात चर्चा करून जनतेला न्याय द्यायचे काम होत असते. सध्या महाराष्ट्रात बलात्कार, दरोडे, अवैध धंदे,अत्याचार, भ्रष्टाचार अशा विविध समस्या निर्माण होत असताना त्यावर कडक कायदे करून जनतेला न्याय देणे अपेक्षीत असताना जनतेची मुस्कटदाबी करत आहे असा आरोप श्रीगांेदा भाजपतर्फे केला आहे.

सरकार मधील मंत्र्यांवर भ्रष्टाचार, अत्याचार प्रकरणी दोन मत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आणि काहींवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील आहेत. या काळात रुग्णांना सरकारने योग्य ती मदत देखील केली नाही.

लॉकडाऊनमुळे अडचणीत असणाऱ्या जनतेला कुठल्याही स्वरूपाचे आर्थिक पॅकेज दिले नाहीत. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

या सर्व विषयावर विरोधी पक्ष प्रश्नाचा भडीमार करेल व हे आघाडी सरकार जनतेसमोर उघडे पडेल या भीतीपोटी अधिवेशन गुंडाळून फक्त दोन दिवसाचे ठेवण्यात आले.

तरी शासनाचा श्रीगोंदा भाजपाच्या वतीने धिक्कार करून राष्ट्रपती व राज्यपाल यांनी या शासनाच्या विरोधात कठोर कारवाई करावी व महाराष्ट्रातील लोकशाही वाचवावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना व राज्यपालांच्या नावे प्रातिनिधिक स्वरुपात अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe