Government Scheme : भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ही कंपनी सर्वांसाठी योजना राबवत असते. कारण या पॉलिसीमधील गुंतावणूक सर्वात सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी मानली जाते.
त्याशिवाय कंपनी सतत नवनवीन योजना राबवत असते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना. या योजनेत तुम्ही फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये मिळवू शकता.
LIC ची जीवन आनंद पॉलिसी आहे. यामध्ये तुम्ही थोडे गुंतवून लाखो रुपये उभे करू शकता. हे लक्षात घ्या की या पॉलिसीचा प्रीमियम टर्म पॉलिसीसारखाच असतो.
जाणून घ्या फायदे
- पॉलिसीधारकाला या पॉलिसीमध्ये परिपक्वता लाभ देण्यात येतो
- समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसी अंतर्गत 125 टक्के मृत्यू लाभ दिला जातो.
- तसेच या पॉलिसीमध्ये बोनसचा लाभही देण्यात येतो.
- हे लक्षात घ्या की पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये तर कमाल मर्यादा नाही.
- या पॉलिसीसह तुम्हाला चार प्रकारचे रायडर्स देण्यात येतात. यामध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन मुदत विमा रायडर आणि नवीन गंभीर आजार रायडर.
करावी लागणार इतकी गुंतवणूक
यामध्ये तुम्हाला महिन्याला 1358 रुपये दरमहा गुंतवावे लागतील. त्याशिवाय तुम्ही दररोज 45 रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर 25 लाख रुपये कमवू शकता.
गुंतवणूक करण्यापूर्वी हे जाणून घ्या की या योजनेत तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही 35 वर्षांपर्यंत मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. महिन्याला 1358 रुपये किंवा दररोज 45 रुपये जमा करण्याशिवाय तुम्ही वार्षिक 16,300 रुपये जमा करू शकता. ही रक्कम 35 वर्षांसाठी या योजनेत जमा केले तर तुम्हाला परिपक्वतेवर 25 लाख रुपये मिळतात.
मिळतो बोनस
जर तुम्ही या योजनेत 35 वर्षांत तब्बल 5.70 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. परंतू, योजनेची मूळ विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. तसेच तुम्हाला 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम अतिरिक्त बोनस या योजनेत दिला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो मात्र पॉलिसी 15 वर्षे जुनी असणे गरजेचे आहे.