बोगस कर्ज काढून कर्जमाफीचा लाभ घेणारा सहकारी संस्थेचा सचिव निलंबित

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सचिवाने कुटुंबातील सभासदांच्या नावे बोगस कर्ज काढून कर्जमाफीचा लाभ घेतल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सुभाष निकम असे कारवाई झालेल्या सचिवाचे नाव आहे. दरम्यान या संदर्भात संभाजी ब्रिगेडने सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सचिव निकम यांनी स्वतःच्या कुटुंबातील सभासद व स्वतःच्या पत्नीच्या नावे क्षेत्र नसतानाही 60 हजार रुपये कर्ज घेतले.

त्याचप्रमाणे सरस्वती निकम 60 हजार रुपये (क्षेत्र 0.04 आर), सुवर्णा निकम क्षेत्र नसतानाही 60 हजार रुपये, सुष्मिता निकम 60 हजार रुपये (क्षेत्र 17 आर), वैशाली दादा निकम 60 हजार रुपये (क्षेत्र 16 आर) असे 3 लाख ररूपयांचे बोगस कर्ज उचलले होते.

संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीवरून निकम यांच्या कुटुंबातील सर्व सभासदांच्या कर्ज खात्याची उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी तपासणी केली असता निकम यांनी पदाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले. निकम यांनी एकूण 4,15,110 रुपयांची नियमबाह्य कर्जमाफी घेतली.

याचा ठपका ठेवत नगर जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव देविदास घोडेचोर यांनी सचिव सुभाष निवृत्ती निकम यांना संस्थेत आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्जमाफीचा लाभ घेतल्याप्रकरणी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News