अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अर्धाब्रास वाळू असलेली ट्रॉली अंदाजे रक्कम 1 लाख 38 हजार 350 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याची घटना राहाता तहसील परिसरात घडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील पिंपळवाडी रोड येथे ट्रॅक्टर व वाळू असलेली बिना नंबर ची ट्रॉली वाळू वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या कर्मचार्यांच्या निदर्शनास आली.
ट्रॉलीत असलेली वाळू ही विनापरवाना असल्याचे माहित झाल्यानंतर ट्रॅक्टर व वाळू असलेली ट्रॉलीवर कारवाई करून ती तहसील आवारात ठेवण्यात आली होती.
सदर ट्रॅक्टर मालक योगेश भाऊसाहेब (वाडगे रा. शिंगवे) यास प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार तहसील विभागाने 1 लाख 17 हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावली होती परंतु नोटीस बजावूनही सदर मालकाने दंड भरला नाही.
दरम्यान शुक्रवार दि. 4 जून रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात अर्धाब्रास वाळू असलेली ट्रॉली तहसील आवारात दिसली नाही म्हणून चौकशी केली असता ती चोरी गेली असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी राहता पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोई यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल आवारे करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम