अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राज्यात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तर प्रशासनाकडून सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यावेळी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी एक सूचक विधान केले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले कि, नियम पाळा लॉकडाऊन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे.
लॉकडाऊनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरू असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधींची पावलं राज्य शासन उचलणार आहे. त्यादृष्टीनं लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच दृष्टीकोन आहे.
गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत. अंतिम झाल्यानंतर त्याबद्दल कळवलं जाईल. दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी संचारबंदी आणि लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला मुंबईत सुद्धा कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असल्याने येत्या 15 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम असणार आ तरराज्यात मागील 24 तासांत 27,918 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 139 जणांचा मृत्यू झाला आहे.
23,820 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|